कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची कोलार मध्ये सभा

कर्नाटकातील कोलार मधील ज्या सभेतील भाषणावरून राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे त्याच कोलार गावात कॉंग्रेस नेते राहुल गांधी रविवारी सभा घेणार आहेत.

कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राहुल गांधी रविवारी सकाळी बेंगळुरू येथे पोहोचतील आणि कोलार येथे जातील आणि तेथे ते पक्षाने आयोजित केलेल्या ‘जय भारत’ रॅलीला संबोधित करतील.

संध्याकाळी, राहुल गांधी बेंगळुरू येथील कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कार्यालयाजवळ नव्याने बांधलेल्या ‘इंदिरा गांधी भवन’ कार्यालयाचे आणि 750 आसनक्षमतेच्या सभागृहाचे उद्घाटन करतील. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला, प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक ज्येष्ठ कॉंग्रेस नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा रविवारचा दौरा पक्षासाठी महत्त्वाचा आहे.