चंदीगढ-हरियाणातील काँग्रेस प्रदेशाध्याक्षांच्या सायकल रॅलीमुळे झालेलेल्या वाहतुक कोंडीत रूग्णवाहिका अडकल्याने सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हरियाणातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ.अशोक तंवर यांच्या नेतृत्वाखाली सोनीपत येथे सायकल रॅली काढण्यात आली होती. तंवर यांच्या रॅलीमुळे तिथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतुककोंडीमुळे रूग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही. वाहतुकीकोंडीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेतून सात महिन्यांच्या या बाळाला तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात नेले जात होते. पण रस्ता न मिळाल्यामुळे सात महिन्याच्या बाळाचा रूग्णवाहिकेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच तंवर यांच्या सायकल रॅलीवर टीका केली जात आहे.
यह वह दुखी पिता की वीडियो है, जो साफ तौर पर बता रहे हैं कि बच्चे की मौत के लिए अस्पताल,डॉक्टर,बिना ऑक्सीजन व मेडिकल स्टाफ की एंबुलेंस जिम्मेदार है। मीडिया लोकतंत्र का एक स्तंभ है उन्हें रिपोर्टिंग करने से पहले तथ्यों को जान लेना चाहिए था। बच्चे के निधन से हम दुखी है, श्रध्दांजलि। pic.twitter.com/9jOK5vRx4u
— Ashok Tanwar (@Tanwar_Indian) August 23, 2018
काँग्रेस पक्षाच्या सायकल रॅलीमुळे रूग्णवाहिका ४५ मिनीटे वाहतूक कोंडीत अडकली. पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी आम्हाला सोनीपत येथील रूग्णालयात जाण्यास सांगितले होते. रूग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. अशी माहिती बाळाच्या पित्याने दिली. दुसरीकडे या दुःखद घटनेला तंवर यांनी पोलिस व प्रशासनाला दोषी ठरविले आहे.