ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मोदींनी स्पष्टीकरण द्यावे; कॉंग्रेस खासदारांचे लोकसभेतून ‘वॉल्क ऑऊट’!

0

नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची भूमिका घेण्याची विनंती केल्याचे सांगितले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचे जगभरात पडसाद उमटले आहे. ट्रम्प खोटे बोलले असा दावा भारत सरकार करत आहे. मात्र कॉंग्रेसने ट्रम्प यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी संसदेच्या अधिवेशनात लावून धरली आहे. आज लोकसभेत कॉंग्रेस खासदारांनी मोदींनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत लोकसभेतून ‘वॉल्क ऑऊट’ केले.

कॉंग्रेसकडून मोदींवर आरोप होत आहे, मोदींनी जर ट्रम्प यांना मध्यस्थीसाठी विनंती केली असेल तर हे जम्मू-काश्मीरच्या जनतेचा अपमान असल्याचे आरोप कॉंग्रेसने केले आहे.