नवनियुक्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी स्वीकारला पदभार

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या नेतृत्वात फेरबदल केले आहे. काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी आज मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी नवनियुक्त कार्याध्यक्ष डॉ.नितीन राऊत, आमदार बसवराज पाटील, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार यशोमती ठाकूर, मुझफ्फर हुसेन यांनीही पदभार स्वीकारला.