कॉंग्रेस सरकार पाच वर्ष टिकणार नाही; शिवराजसिंह चौहान यांचे संकेत

0

भोपाळ-मध्य प्रदेशमध्ये १५ वर्षानंतर कॉंग्रेस सत्तेत आली आहे. कॉंग्रेसने सपा, बसपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नसल्याचे संकेत दिले आहे.

शिवराजसिंह चौहान पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. काळजी करू नका पुन्हा आपली सरकार येईल असे ते यावेळी म्हणाले.

कॉंग्रेसने मध्य प्रदेशमध्ये २३० पैकी ११४ जागा जिंकल्या आहे. १०९ जागेवर भाजपचा विजय झालेला आहे. कॉंग्रेसकडे १२१ आमदारांचा पाठिंबा आहे.