बंगळूर- देशातील चार-पाच राज्य वगळता इतर सर्व राज्यातील कॉंग्रेस सरकार गेली आहे. जनतेने कॉंग्रेसचा सुपडा साफ करून भाजपला नेतृत्वाची संधी दिली आहे. देशातील सर्वत्र कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला त्यावेळी जितकी चिंतीत नसेल त्यापेक्षा जास्त चिंतीत कॉंग्रेस कर्नाटक राज्य हातून जाण्याचे चिन्ह दिसत असल्याने आहे. कॉंग्रेसने कर्नाटकात प्रचंड भ्रष्ट्राचार केला असून केवळ भ्रष्ट्राचारामुळेच कॉंग्रेस जिवंत राहू शकते असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर सडाडून हल्ला चढविला.
कर्नाटकात खोटे बोलून, खोटी अफवा पसरवून कर्नाटक तोडण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत असल्याचे आरोप मोदी यांनी केले. निवडणूक जिंकण्यासाठी नव नवीन नाटक कॉंग्रेस करत आहे. कर्नाटकातील जंगले संपवले, नैसर्गिक संपत्ती संपविली आणि फक्त आपले खिसे भरण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे असे आरोप मोदी यांनी यावेळी केले. कॉंग्रेस जनतेने भ्रष्ट्राचारातून आपले घर भरले आहे. यांना घरी पाठविण्याची ही एकमेव संधी असून ही संधी वाया घालवू नका असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
हातमाग व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न
कर्नाटक ही कामगारांची भूमी आहे. कामगारांच्या घामाने कर्नाटकाची भूमी फुलली आहे. मात्र पाच वर्षात कॉंग्रेस सरकारने या भूमीला पार लुटले आहे. हातमाग व्यवसाय पार लयाला गेले आहे. केंद्र सरकार हातमाग उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नरत आहे. कर्नाटकात सत्ता आल्यास हातमाग कामगारांना अच्छे दिन येतील असे मोदींनी यावेळी सांगितले.