राहुल गांधी दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर; भारतीयांच्या समस्येबाबत करणार चर्चा !

0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या दुबई दौऱ्यावर आहोत. दुबईत विमानतळावर त्यांच्या मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विमानतळावर ‘राहुल-राहुल’ अशी घोषणाबाजी करण्यात येत होती.

दुबई आणि अबु धाबीमधील दौऱ्यात राहुल गांधी येथील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. तसेच, येथील विद्यार्थी आणि उद्योगपतींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईमध्ये असणाऱ्या भारतीयांना येणाऱ्या अडचणी राहुल गांधी या दौऱ्यात ऐकून येणार आहेत. तसेच, येथील भारतीयांच्या समस्या संसदेत मांडणार आहेत. राहुल गांधी यांचा या वर्षातील पहिलाच हा विदेश दौरा आहे. त्यांच्यासोबत, सॅम पित्रोदा आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी आहेत.