राहुल गांधींनी मतदान केंद्र ताब्यात घेतले; स्मृती इराणींचे आरोप

0

अमेठी: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या 51 जागांसाठी आज मतदानाला सकाळी ७ वाजेपासून सुरुवात झाली आहे. अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रायबरेलीमधून सोनिया गांधी, लखनऊमधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी बडे नेतेमंडळी रिंगणात आहेत. दरम्यान अमेठीतून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहून गांधी यांनी मतदान केंद्र ताब्यात घेतल्याचे आरोप केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

निवडणूक आयोगाने सतर्क राहावे असेही स्मृती इराणी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

अमेठीतील एका वृद्ध महिलेने कॉंग्रेसकडून जबरदस्तीने मतदान केले जात असल्याचे आरोप केले आहे. मी भाजपला मतदान करत होते, मात्र माझे हात जबरदस्तीने पंजा या निशाणीवर नेण्यात आल्याचे आरोप महिलेने केले आहे.