जिंकलो तर पंतप्रधान!

0

मुंबई । सन 2019 मध्ये जिंकलो तर पंतप्रधान बनू शकतो, असे ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना 2019 निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्‍न विचारला. यावर ‘हो नक्कीच’, असे उत्तर राहुल गांधींनी दिले.

प्रथमच जाहीरपणे केले वक्तव्य!
सन 2019 निवडणूक जवळ आली असून, त्यानिमित्ताने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट आहे. मात्र, राहुल यांनी प्रथमच जाहीरपणे आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे.