तमिळनाडूतील हिंसाचाराला कॉंग्रेस जबाबदार-हर्षवर्धन

0

नवी दिल्ली – तामिळनाडूतील थुथुकुडी येथे स्टरलाईट कंपनीविरोधातील आंदोलनात झालेल्या हिंसाचाराला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकार जबाबदार असल्याचा दावा केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी केला. थुथुकुडी येथील स्टरलाईट तांबे कंपनीच्या विस्ताराला विरोध करणाऱ्या स्थानिक लोकांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जवळजवळ १३ लोकांचा जीव गेला तर ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

मी काही दिवस देशाबाहेर असल्याने मला याविषयाची कल्पना नाही. मी याविषयी वर्तमानपत्रांमध्ये वाचले. आम्ही याप्रकरणात नेमके काय घडले हे तपासू. हे सर्व मागील सरकारच्या काळात घडले, पण मला त्यात जाऊन नवा मुद्द तयार करायचा नाही. ते पुढे म्हणाले, की समाजात लोक आंदोलने आणि निदर्शने करत असतात. मला त्यांच्या विरोधात अथवा बाजूने काहीही बोलायचे नाही. मी बाहेरून परत आल्यावर तत्काळ अधिकाऱ्यांना या विषयात गांभीर्यांने लक्ष देत खोलवर अभ्यास करणार असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी काँग्रेसने स्टरलाईट प्रकल्पाच्या विस्ताराला युपीएच्या काळात परवानगी देण्याच्या अहवालांचे खंडण केले आहे. आत्तापर्यंत ६७ लोकांना हिंसा भडकावण्यासाठी अटक करण्यात आली आहे.