जळगाव जिल्ह्यात कॉग्रेसला जोरदार झटका

माजी खा.डॉ. उल्हास पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांचा भाजपात!

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा कॉग्रेसला आज जोरदार झटका बसला आहे. प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ.केतकी पाटीलसह आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी डॉक्टर बापलेकीच स्वागत केले. मंत्री गिरीश महाजन यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

डॉ. उल्हास पाटील यांच्या सोबत शेकडो समर्थकही आज भाजपात दाखल झाले आहे. यावेळी डॉ. उल्हास पाटील आणि केतकी पाटील यांनी आपल्या मनोगतातून भाजप प्रवेशाची भूमिका विशद केली. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रवेश करणाऱ्या बापलेकीसह कार्यकर्त्यांचे भाजपत स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनय से विजय तक, राम से राष्ट्र तक या संकल्पनेला मजबुती देण्याचा संकंल्प करून हिंदुत्वाच्या विचार सरणीवर काम करणार असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी सांगितले. भाजपात प्रवेश करणे हा प्रभू रामाचा आशीर्वादच असल्याची भावना डॉ.केतकी पाटील यांनी प्रसंगी व्यक्त केली.
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी भाजपात आज प्रवेश करून आपला वनवास संपल्याची भावना व्यक्त करीत कॉग्रेसमध्ये आपण वनवासात असल्याची टीका आज अप्रत्यक्षपणे केली. कॉग्रेसमध्ये नेते आम्हाला भेटत सुद्धा नसल्याची भावना व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोदींचे हात बळकट करण्याचा संकल्प डॉ.उल्हास पाटील यांनी याप्रसंगी केले. आपल्या सर्वांचे भाग्यविधाते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजपा नेत्यांचे कौतुक डॉ.उल्हास पाटील केले. मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बापलेकीचे स्वागत करताना डॉ. केतकी पाटील यांच्या कार्याची स्तुती केली. डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील यांनी योग्य निर्णय घेतल्याचे सांगितले. याप्रसंगी युवानेते रोहित निकम, अमोल जावळे, देवेंद्र मराठे, नंदू महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.