मुंबई: देशात २०१९च्या लोकसभा निवडणुका या ७ टप्प्यात पार पडल्या. त्याचा निकाल आज लागला असून देशात पुन्हा मोदी सरकार स्पष्ट बहुमताने विराजमान होणार हे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी प्रतिकिया देत म्हटले आहे कि, ‘देशातल्या निवडणुका ह्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उस्तव असतो, मग त्या निवडणुका कुठल्याही असो’.२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये कॉंग्रेसने चुकीची भाषा वापरली असेते म्हणाले.
जनतेचा कौल स्वीकारणे हे राजकीय पक्षांची जबाबदारी असून, निवडणुकीतील झालेले वाद सोडून आता पुन्हा एकदा नवीन भारत घडवण्यासाठी काम करू असे गडकरी म्हणाले. या निवडणुकीत राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या. त्यांची ही भाषा योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या ५० वर्षात जे काम झाले नाही ते आमच्या सरकारने गेल्या ५ वर्षात करून दाखवले आहे. आता कटुता संपवून लोकशाही यशस्वी बनवण्यसाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले आहे. आम्ही स्थिर, विकासाभिमुख सराकर दिले असेही ते म्हणाले.