मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

लोकसभा आणि विधानसभा मात्र महाविकास आघाडीतून लढवण्याचा निर्णय

मुंबई l कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मनोबल वाढलय, महाराष्ट्रात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केलीय. तर विधानसभा आणि लोकसभा महाविकास आघाडीत एकत्र लढणार असल्याची माहिती आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही आता आपली सत्ता येऊ शकते या आशेने काँग्रेसचे कार्यक्रम तें आणि पदाधिकारी कामाला लागलेत.

राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी आगामी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याची तयारी काँग्रेसने सुरू केलीय.

महानगरपालिका निवडणुका लागल्या तर सर्वात एक नंबरला शिवसेना ठाकरे गट असेल आणि दोन नंबरला काँग्रेस असेल आणि त्यानंतर भाजप आणि शिंदे गट असेल असा दावा काँग्रेसचे नेते करू लागलेले आहेत. सर्वेक्षणात जरी शिवसेना ठाकरे गट जर एक नंबरला असेल आणि दोन नंबरला कॉंग्रेस असेल तरी काँग्रेसचा पारंपारिक मुंबईतला मतदार हा दलित मुस्लिम आणि सर्वसामान्य राहिलेला आहे. त्यामुळे जर एकत्रित निवडणुका लढल्या तर काँग्रेसच्या हा मतदार ठाकरे गटाकडे सरकण्याची भीती काँग्रेसला आहे.