पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या कापसाच्या समस्या सह नागरिकांच्या समस्यांसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जन्मदिनी पाचोर्यात कॉंग्रेस ने भव्य दणका मोर्चा काढला यात मोर्चेकरींनी तीन तास समारोप स्थळी ठिय्या आंदोलन करत अधिकारींच्या आश्वासना नंतर मोर्चा ची सांगता झाली.
पाचोरा कॉंग्रेस ने शेतकऱ्यांसाठी व नागरीकांच्या समस्यांसाठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली दणका मोर्चा चे आयोजन केले होते. हा मोर्चा प्रचंड यशस्वी झाला या मोर्चाने नवा इतिहास केला असुन मोर्चातील मागण्यांसंदर्भात विज वितरण कंपनी, नगरपरिषद, पुरवठा विभाग, सह प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मोर्चा ची सुरवात बाहेरपुरा भागातील मच्छी बाजार येथुन करण्यात आली मोर्चा मध्ये राहुल गांधी जिंदाबाद, शेतकर्यांना न्याय मिळालाच पाहिजे, नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी शहर दणाणले. यावेळी मोर्चात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, युवक अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र महाजन, काशिनाथ अहिरे, ओबीसी सेल तालुका इरफान मनियार, एस सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, महीला जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, जिल्हा सदस्या अॅड मनिषा पवार, शंकर सोनवणे, प्रकाश चव्हाण, इस्माईल तांबोळी, इब्रान देशमुख, अमजद खान, शरीफ शेख, सईद शेख शब्बीर, परवेज खान, अकील शेख कलंदर, शरीफ शेख मुसा, सरदार खान दिलावर खान, आसिफ बागवान, वामन पाटील, बंटी भोई, आंनद गोसावी, आंनद अहीरे, रईस खान,सलिम शेख युसूफ, फिरोज शेख रोशन, इम्रान पठाण, इमाम शेख रज्जाक, भोला पाटील, संदीप पाटील, राजेंद्र भदाणे, रहीम शेख, सचिन सोनवणे आदी सहभागी होवुन मोर्चा सरळ गांधी चौक जामनेर रोड वरून तळपत्या उन्हात प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत धडकला यावेळी मोर्चाला सामोरे जाण्यासाठी एकही विभागाचे अधिकारी उपस्थितीत नव्हते म्हणून मोर्चेकरांनी संतप्त भावना व्यक्त करुन जो पर्यंत सबंधित विभागाचे अधिकारी येत नाही तो पर्यंत मोर्चा हटणार नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली तब्बल तिन तासाने विज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी शिरसाठ, नगरपरिषद च्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,मराठे महसूल चे नायबतहसिलदार सुभाष कुभांर, पुरवठा विभागा चे रणजीत पाटील, श्री येवले आदी उपस्थितीत झाले मोर्चा च्या मागण्यांसंदर्भात त्वरित सोडविण्याचे आश्वासन सबंधित अधिकारी दिल्या वर मोर्चेकरी घरी परतले. शहरातील पाहीलाच मोर्चा असा असेल की मागण्या मान्य करूनच मोर्चाचा समारोप झाल्याची चर्चा सुरू होती. पो हे. कॉ. सुर्यवंशी,दिपक शिरसाठ पो कॉ मल्हार देशमुख आदींनी बंदोबस्त ठेवला.