नवी दिल्ली-गुरूवारी पेट्रोल-डीझेलचे दर पुन्हा स्वस्त झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल १२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती १४ पैशांनी स्वस्त झाले आहे. कपातीनंतर पेट्रोल ७६.१६ रुपये प्रती लिटर आणि डीझेल ६७.६८ रुपये प्रति लीटर आहे. बुधवार पेट्रोल, डीझेलच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेले नव्हते. दरम्यान २३ दिवसात पेट्रोल २ रुपये २५ पैसे स्वस्त झाले आहे. डीझेलचे दर १ रुपये ६७ पैशांनी स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० दिवसात ६ डॉलर प्रती बॅरेलने कमी झाले आहे.
आजचे दर
पेट्रोलचे दर आज दिल्ली ७६.१६ रुपये, कोलकाता ७८.८३, मुंबई ८३.९२, चेन्नई ७९.०४ रुपये आहे. तर डीझेल दिल्ली ६७.६८ रुपये, कोलकाता ७०.२३, मुंबई ७१.९९, चेन्नई ७१.४४ रुपये प्रती लिटर आहे.