बारामती – नगरपालिकेची कामे जाणीवपूर्वक वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे अध्यक्षस्थानी होत्या. या सभेत विविध कामांना मुदतवाढ देण्याचा विषय होता. या कामांचा तक्ता नगरसेवकांपुढे मांडण्यात आला. कामाबाबत ना कंत्राटदार ना प्रशासन गंभीर असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त
समीर चव्हाण, संजय संघवी, नवनाथ बल्लाळ, सुनील सस्ते, गणेश सोनवणे, सूरज सातव, विष्णुपंत चौधर, अमर धुमाळ यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विकासकामांच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत या बाबत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेत काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी जागेवरच केली.
दरम्यान, मूळ कंत्राटदारांच्या आडून दुसरे कोण कंत्राटदार काम करतात, याचीही माहिती पुढील बैठकीत सभागृहासमोर ठेवावी आणि प्रत्येक विकासकामाची सविस्तर माहिती प्रत्येक बैठकीत मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहाला द्यावी, अशी सूचना गटनेते सचिन सातव यांनी केली. मुख्याधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली.