शिवरायांबद्दल वादग्रस्त पोस्ट; पायल रोहतगीने मागितली जाहीर माफी

0

मुंबई: समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत सतीप्रथेचे समर्थन करणारी अभिनेत्री पायल रोहतगीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यावरून पायल रोहतगीवर बरीच टीका झाली. अखेर पायल रोहतगीने जाहीर माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असे पायलने म्हटले आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1135532513252655106
https://janshakti.online/new/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/

‘शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म एका शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता’ असे विधान तिने केले होते. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर सडकून टीका करण्यात आली.

हे सगळे प्रकरण चिघळण्यापूर्वी ती माफी मागून मोकळी झाली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत तिची बाजू मांडली आहे.