कलम ३७०: पीडीपी नेत्यांनी फाडले संविधान !

0

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस केली. तसा प्रस्ताव मांडताच पीडीपीचे खासदार एमएम फय्याज आणि नाझीर अहमद लावे यांनी संसदेत गदारोळ सुरु केला. दोघांनी संविधानाच्या प्रती फाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पीडीपीच्या दोन्ही खासदारांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. प्रस्तावाला विरोध करण्यासाठी म्हणून एमएम फय्याज यांनी संसदेच्या परिसरात स्वत:चे कपडे फाडले.

पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. ट्वीटरवरून त्यांनी भारतीय लोकशाही काळा दिवस आहे. ३७० कलम हटवण्याचा निर्णय हा अवैध आणि असंवैधानिक आहे. यासोबत त्यांनी या निर्णयाचे वाईट परिणाम होतील अशी भीती व्यक्त केली आहे.