CORONA EFFECT: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट मोठ्या अंकांनी कोसळले !

0

मुंबई: कोरोना व्हायरसने जगभरात दहशत माजविली आहे. याचा व्यापार आणि व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. शेअर बाजारावरही करोनाचा परिणाम दिसून येत आहे. आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार खुला झाला मात्र मोठ्या पडझडीने. बाजाराला सुरुवात होण्यापूर्वी सेन्सेक्स १५९१.८० अंकांनी कोसळून ३२,५११.६८ अंकांवर उघडला. तर निफ्टी ४४६.८५ अंकांनी कोसळत ९५०८.३५ अंकांवर उघडला. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाचे मूल्यही १५ पैशांनी घसरल्याचे पहायला मिळाले. यानंतर सध्या रुपयाची किंमत ७४.०६ रुपयांवर स्थिरावली आहे. दरम्यान, शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ७३,९१ रुपयांवर होते.

शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड पाहायला मिळाली. शुक्रवारी लोअर सर्किटमुळे बाजाराला सुरुवात होताच ट्रेडिंग थांबवावे लागले होते. त्यानंतर ४५ मिनिटांच्या अडथळ्यानंतर बाजार पुन्हा सुरु झाला आणि पुढे याची स्थिती सुधारत गेली. दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स १,३२५.३४ अंकांनी वाढून ३४,१०३.४८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ४३.५० अंकांनी वाढत १०,०२३.६५ वर बंद झाला होता.