मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक बाजारपेठा, मॉल्स, क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे. नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहे. दरम्यान नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांसह राज्यातील सर्व निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनिश्चित काळासाठी निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
निवडणुका रद्द करण्याची मागणी देखील होत होती, त्यावर अखेर निर्णय घेण्यात आला आहे.