कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला बळी; मुंबईतील वृद्धाचा मृत्यू

0

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात कहर केली आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित करण्यात आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. ३९ वर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या पोहोचली आहे. त्यात कोरोनामुळे महाराष्ट्रातला पहिला बळी गेला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. देशातला हा तिसरा बळी आहे. देशातील संशयितांचा आकडा आता १०८ वर पोहोचला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक मॉल्स, बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात देखील एकाच वेळी ५० टक्के कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्याबाबत देखील शासन विचाराधीन असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.