नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. हजारो नागरिकांना विषाणूची लागण झाली आहे. भारतातही याचा शिरकाव झाला आहे. केरळात संशयित रुग्ण आढळला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय आरोग्य यंत्रणेने काळजी घेतली आहे. दरम्यान चीनच्या वूहान शहरातून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतात येताच आनंदोत्सव साजरा केला. हरियाणामधील सैन्यदलाच्या कॅम्पमध्ये थांबले आहेत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांनी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. भारत सरकारने चीनमधून तेथे वास्तव्यास असलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विमान पाठविले होते. आज सकाळी हे विमान दिल्लीत दाखल झाले. ३२३ भारतीय देशात दाखल झाले आहे. ७ मालदीवचे रहिवाशीही भारतीय नागरिकांसोबत भारतात दाखल झाले.