coronavirus: मतदारसंघात जाऊन जनजागृती करा; भाजपच्या सर्व खासदारांना सूचना

0

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात खर केला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीने वातावरण आहे. सरकार जनजागृती करत असून कोरोनापासून बचावासाठी सर्व उपाययोजना करत आहे. दरम्यान भाजपच्या सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. दिल्लीत भाजपच्या सर्व खासदारांची बैठक झाली, यात कोरोनाबाबत जनजागृतीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सर्व नेते, खासदार उपस्थित होते.