मुंबई: कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. आज सोमवारी मुंबईत नव्याने चार तर यवतमाळला एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च पर्यंत परीक्षा स्थगित करण्यात आले आहे.
मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याचा प्रयत्न होत आहे. पुण्यातही जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत विचार सुरु आहे.