पिंपरी-चिंचवड- आजच्या धकाधकीच्या काळात कामगारांकडे समाजाचे दुर्लक्षीत होत आहेत. फक्त आपलेच काम करून घेण्यात सर्वच गर्क आहेत. परंतु, याच दिवसाचे औचित्य साधून समाजातून दुर्लक्षीत झालेल्या बांधकाम, स्वच्छता, टपाल कामगारांचा सत्कार होणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. ‘नगरसेवक नामदेव ढाके युवा मंच च्यावतीने 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच नगरसेवक नामदेव ढाके यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कामगारांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.
बिजलीनगर येथे कार्यक्रम
मंगळवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक 17 मधील बिजलीनगर येथे झालेल्या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेवराव ढाके, स्थायी समिती सदस्य विलास मढेगिरी, ब प्रभाग अध्यक्ष करुणाताई चिंचवडे, प्रमोद मिसळ, प्रभाग समिती सदस्य बिभीषण चौधरी, देविदास पाटील, भाजपा कामगार आघाडी शहर उपाध्यक्ष शंकरराव पाटील, नगरसेवक शितल शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ, शत्रुघ्न काटे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, नवनाथ वाघमारे, सचिन चिंचवडे, सिद्धीविनायक ग्रुपचे अध्यक्ष कुंदन ढाके, समाज प्रबोधनकार निरंजन भाकरे आदी उपस्थित होते.
सर्वाधिक विकासकामे प्रभागात
जगताप म्हणाले, अनेक वर्षांपासून या प्रभागातील घरे वाचविण्यासाठी नगरसेवक ढाके यांनी एक सामान्य कार्यकर्ता असताना अनेक आंदोलन उभी केली. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून लवकरच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याचा फायदा या भागातील 90 टक्के लोकांना होणार आहे. त्याचप्रमाणे, शास्तीकराचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. गेल्या वर्षभराच्या काळात शहरातील कुठल्याही प्रभागात झाले नाही एवढी विकासकामे ढाके यांच्या वारंवार पाठपुराव्याने प्रभागात झाली आहेत.
आश्रम शाळेत फळ, शिधा वाटप
तत्पूर्वी, सकाळी चिंचवडमधील गुरुकुलम् आश्रम शाळेतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना फळ वाटप व अन्न शिधा वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी, ड. सतिष गोरडे, गतिराम भोईर, सौ. मोहिते, जाधव, नगरसेवक नामदेव ढाके, बिभीषण चौधरी, आसाराम कसबे, शंकरराव देशमुख, संजय कुलकर्णी, शंकर पाटील, मनोज ढाके, अशोक बोडखे, भुषण सरोदे, नवनाथ वाघमारे, प्रदिप ढाके, शुभव ढाके, नितीन वाघमारे, हेमंत ननवरे, संदिप महाजन, रविंद्र ढाके, कैलास रोटे, योगेश महाजन उपस्थित होते.
दरम्यान झालेल्या रक्तदान शिबीरात 36 बाटल्यांचे संकलन करण्यात आले. पिंपरी येथील पीएसआय रक्तपेढीच्या सहकार्याने डॉ. दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम संयोजनासाठी व्हिजन फाऊंडेशन पिंपरी- चिंचवड शहर, संवाद युवा प्रतिष्ठान, चिंचवड, शिवनगरी प्रतिष्ठान, सरदार वल्लभभाई युवा मंचाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिभिषण चौधरी यांनी केले.