जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ येथे समुपदेशक सौ आरती चौधरींचे समुपदेशन

भुसावळ( प्रतिनिधी) येथील जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघात शनिवारी भुसावळ शहरातील समुपदेशक सौ आरती चौधरी यांनी समुपदेशन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री आर आर बावस्कर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या शुभहस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर कै. अरुण मांडळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .पाहुण्यांचा परिचय डॉ. सुधा खराटे यांनी करून दिला .”नात्यांमधील सुसंवाद “या विषयावर मार्गदर्शन करतांना सौ आरती चौधरी यांनी पुढील मार्गदर्शक तत्वे सांगितली १) कोणत्याही वयाच्या टप्प्यात संवादाचं पाणी नात्यांना दिलं पाहिजे. त्यामुळे नातं निकोप राहते तसेच फुलत जाते. 2) कालानुरूप आपल्या सवयी बदलवा स्वच्छता व नीटनेटकेपणाने राहून कुटुंबाशी समायोजन करा 3) वृद्धांनी स्वास्थ्यासाठी नेहमी जागरूक राहून कुटुंब आणि समाजातील सर्व घटकांशी जाणीवपूर्वक सुसंवाद साधावा 4) घरात आणलेल्या नवीन महागड्या वस्तूबाबत नकारात्मकता न दाखवता आस्तेवाईकपणे आनंद व्यक्त करा.5 आपण कुटुंबाच्या प्रगतीसाठी केलेल्या श्रमांचे व प्रयत्नांचे वारंवार कथन करू नका6) राग , क्रोध यावर नियंत्रण घालून संयमाने वागा व मनःशांती ठेवा7) नातवंडांचे वेळोवेळी आस्तेवाईकपणे चौकशी करून कौतुक करा8) या वयात कमकुवत झालेली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुचवलेले व्यायाम नियमितपणे करा9) आपणास स्वतःस कुटुंबाच्या सौख्यासाठी विलग राहणे ते आवश्यक वाटल्यास अथवा स्वेच्छेने व स्वयंनिर्णयाने वृद्धाश्रमात जाऊ शकतात10) प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीत नकारात्मक भूमिका न घेता सदसदविवेक बुद्धीने सकारात्मक भूमिका घ्या. अध्यक्ष श्री आर आर बावस्कर यांनी देखील संवादाचं महत्त्व विशद करणारे प्रसंग सांगितले .त्यांनी पत्रलेखन ,मोबाईल, ईमेल तसेच देहबोली यातून उत्कृष्ट संवाद करता येतो असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव तिडके यांनी केले तर आभार श्रीमती पुष्पा पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष शांताराम बोबडे ,ज्ञानदेव इंगळे, देवराम पाटील ,दिनकर जावळे व सर्व कार्यकारी सदस्य व उप|स्थित सभासद यांनी सहकार्य केले. पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.