नवी दिल्ली: देशभरात लोकसभा निवडणूक सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले आहे. दरम्यान विरोधी पक्षांकडून ईव्हीएम मशीनवर शंका घेतली जात असून गडबड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी व्हीव्हीपॅटच्या 50 टक्के मतपावत्यांची मोजणी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली असून तब्बल 21 विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दखल केली आहे.
काल मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांची बैठक झाली. यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.