नवी दिल्ली: कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजविला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोणाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. कोरोनामुळे संपूर्ण जग चिंतीत आहे. भारतातही कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ३९ लाखांचा टप्पा पार केला आहे. दररोज ६५-७० हजारामध्ये आढळणारी रुग्ण संख्या आता ८० हजाराच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासात कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रुग्णसंख्येचा नवा उच्चांक धडकी भरविणारा आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 83,341 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,096 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 39,36,748 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 68,472 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,31,124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 30,37,152 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. भारतात पाच कोटींच्या जवळपास कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गुरुवारी एका दिवसात ११ लाख ६९ हजार ७६५ कोरोना चाचणी करण्यात आली आहे.