या राज्याचे आरोग्यमंत्री स्वत:वर करणार कोरोना लसीचे ट्रायल

0

चंडीगढ: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगभरात कोरोनाची लस निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला यात यश आलेले नाही. भारतात देखील स्वदेशी निर्मितीची लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. भारत बायोटेक या कंपनीने लस निर्मिती सुरु केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी लवकरच होणार आहे. त्यानंतर लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हरियाना राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी तयारी दर्शवली आहे, ते स्वत:वर ट्रायल करून घेणार आहे. अनिल वीज यांनी ट्वीटकरून याची माहिती दिली. भारत बायोटेक २० नोव्हेंबर हरियाना राज्यात लसीची चाचणी घेणार आहे, त्यासाठी मंत्री वीज यांनी स्वत:ला राज्यातील पहिले स्वयंसेवक म्हणून जाहीर केले आहे.

मानवी शरीराने लसीच्या चाचणीला प्रतिसाद दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.