जळगाव प्रतिनिधी ।
जळगाव एमआयडीसी पो.स्टे. येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ मे रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहरातील के सेक्टरमधील एच.डी. फायर कंपनीच्याजवळ रेकार्डवरील आरोपी शैलेश शंकर चौधरी (वय १९२२, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) हा लोखंडी चॉपरसह मिळुन आला. जिल्हाधिकान्यांनी पारीत केलेल्या आदेशाचा भंग करतांना मिळुन आला. त्यामुळे त्याच्याविरुध्द आम अॅक्ट कलम ४/२५ तसेच मु.पो.अधि. कलम ३७१३ चे उल्लंघन १३५ प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी शैलेश शंकर चौधरी याच्यावर यापूर्वी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याबाबत एमआयडीसी पो.स्टे. ला गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. आनंदसिंग पाटील, पो.हे.कॉ. गणेश शिरसाळे, पो.ना. विकास सातदिवे, किशोर पाटील, इम्प्रण सैय्यद, योगेश बारी, पो.कॉ. मुकेश पाटील, किरण पाटील, लगन तायडे यांनी केली आहे.