यहा बाजार समितीच्या निवा उमेदवारांची गर्दी, उद्या अखेर माघार

| नंदुरबार प्रतिनिधी । दुरबारसह जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या २० एप्रिलला माघारीच्या अंतिम दिवशी घडणाऱ्या घडामोडींनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असले, तरी निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या होतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, या निवडणुका जिल्ह्यात राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत असल्याने राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. बाजार समित्यांवरील आतापर्यंतच्या राजकीय वर्चस्वाचा विचार केल्यास नंदुरबार बाजार समितीवर मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पाच वर्षे सत्ता प्रस्थापित करून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा वर्चस्वाला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर श्री. रघुवंशी यांनी पुन्हा बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली. सध्याही त्यांचेच वर्चस्व आहे. ठरणार आहे.

आताच्या निवडणुकीतही भाजपचे नेते तथा मंत्री डॉ. गावित व शिवसेनेते नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटात चुरशीची लढत रंगणार आहे. दोन्हीही नेत्यांचे राज्यपातळीवर वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. नंदुरबार बाजार समितीत भाजपचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे स्वतः निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अधिकच प्रतिष्ठेची ठरणार आहे.

शहाद्यातील क्लिष्ट चित्र

दरम्यान, शहादा बाजार समितीवर दीपक पाटील गटाचे आतापर्यंत एकतर्फी वर्चस्व होते. मात्र, सध्या अभिजित पाटील यांनीही उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीही निवडणूक रिंगणात आहे. मंत्री डॉ. गावित यांच्या नेतृत्वाखाली हेमलता शितोळे यांनीही वेगळा गट उभा केला आहे. तळोद्यात बिनविरोधची पंरपरा आहे. जागा वाटपाचा सर्वपक्षीय फार्म्युला ठरला असल्याचे बोलले जात आहे. मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे. अक्कलकुवामध्ये पाच जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत.

 

नवापूरला माजी मित्रांत लढत 

नवापूर बाजार समितीवर काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व होते. आता माणिकराव गावित यांचे पुत्र भाजपमध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक व भाजपचे नेते भरत गावित यांच्या गटात चुरशीची लढत होणार आहे. या बाजार समितीवरील आतापर्यंत असलेले काँग्रेसचे वर्चस्व शाबूत राहते, की भाजपचे भरत गावित यांचे वर्चस्व सिद्ध होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण हे दोन्ही नेते यापूर्वी एकत्र होते. त्यामुळे दोघांचे वर्चस्व होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.