नोटबंदीची संकल्पना ही आरएसएसची-राहुल गांधी

0

लंडन-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटबंदी केली. मात्र नोटबंदीमुळे काहीही साध्य झाले नाही. नोटबंदीची मूळ कल्पना ही आरएसएसची होती तो विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात घट्ट बसला आहे असे आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते परदेश दौऱ्यावर आहे. लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये बोलतांना त्यांनी हे आरोप केले आहे.

भारताची आर्थिक प्रगती आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.