जामनेरात दिवाणी फौजदारी न्यायालय मार्फत सायकल रॅली संपन्न… 

जामनेर प्रतिनीधी l

जामनेर दिवाणी व फौजदारी न्यायालय कडून पर्यावरण सप्ताह निमित्त जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश यांच्या आदेशाने जामनेर सायकलिंग गृप सहकार्य ने सायकल रॅली काढण्यात आली. जामनेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दि.न.चामले साहेब तसेच सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश बी एम.काळे साहेब तसेच दुसरे सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश पी.व्ही. सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीत रॅली संपन्न झाली यावेळी

वकील संघाचे अध्यक्ष बी.एम.चौधरी व वकील संघाचे सचिव महेंद्र बी.पाटील सरकारी वकील ए. डी. सारस्वत,कृतिका भट तसेच पत्रकार तथा जामनेर सायकलिंग गृप चे सभासद प्रदिप गायके पी के सोनार एस वाय वाघ यांनी सहभाग घेतला. तसेच न्यायालयीन कर्मचारी विजय पाटील,एस.ए. सुरवाडे,व्ही.डी. मोरे,स्वप्नील पाटील असे हजर होते.

त्या वेळी दि.न.चामले साहेब तसेच सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश आ.बी एम.काळे साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली ला सुरवात केली