डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘विद्याश्रम टेकफिएस्टा’ परिसंवाद उत्साहात

शहादा प्रतिनिधी । पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिसंवाद विद्याश्रम टेकफिएस्टा २०२३ नुकताच उत्साहात घेण्यात आला. उद्घाटन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार, प्राचार्य बी. के. सोनी, प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, प्राचार्य श्रीमती के. एल. महाडीक व विविध शाखेचे विभाग प्रमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन हिमानी सूर्यवंशी हिने केले. परिसंवादात विविध तांत्रिक विषयावर शोधनिबंध प्रस्तुत करण्यात आले. तसेच इम्पॅक्ट ऑफ आर्टीफिशियल इंटेलिजन्स, मेंटल हेल्थ, सोशल मीडिया-नीड ओर डिझायर आदी विषयावर पोस्टर सादरीकरण करण्यात आले. सीक फॉर गीक, मॅड फॉर कॅड, टेसला माइंड, चोप स्ट्रक्चर आणि सर्किट मॅनियासारख्या विविध तांत्रिक कार्यक्रमात ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

पेपर, पोस्टर सादर करणाऱ्या विजयी स्पर्धकांना पारितोषिके

पेपर सादरीकरणात प्रथम पारितोषिक तुषार संजय पाटील, श्रुती जगदीश पटेल, करिश्मा सतीश पाटील, भाग्यश्री दीपक चौधरी, द्वितीय पारितोषिक अनिष्का शुक्ला, मिहीर खेडकर, प्रियंका संजय बडगुजर तर तृतीय पारितोषिक साक्षी कांतीलाल चौधरी, हर्षदा दगा शिंदे, रिया अंबालाल पाटील, सुदर्शन नरेंद्र पाटील यांना देण्यात आले. पोस्टर सादरीकरणात प्रथम पारितोषिक आकांक्षा क्रिष्णा सोनवणे, द्वितीय पारितोषिक किर्ती रवींद्रसिंग गिरासे यांना देण्यात आले. पारितोषिक वितरण युवा इंजि. मयूर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने व यशप्राप्तीसाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. नितीन जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. आकाश कोळी, विभागप्रमुख प्रा. विनोद महाजन, प्राध्यापक, कर्मचारी व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. धीरज शुक्ला तर प्रा. अजहर पठाण यांनी आभार मानले.