डी. वाय. एस. पी. यांच्या सतर्कतेने वाचले तिघांचे प्राण
- नांद्रा ते हडसन दरम्यान झाला होता मोटरसायकलचा अपघात....
पाचोरा ( प्रतिनिधी )
पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे हे २७ जुन रोजी रात्रीच्या सुमारास जळगांव येथुन पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांना नांद्रा ते हडसन दरम्यान मोटरसायकल अपघातात महिला, एक तरुण व चिमुकले बाळ हे रस्त्यावर पडलेले डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वाहन थांबवुन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांना घटनेची माहिती देवुन जखमींना तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येवुन तिघ जखमींची प्रकृती स्थिर आहे.
पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे, पोलिस काॅन्स्टेबल अजितसिंग राजपुत, चालक पंकज मोरे हे २७ जुन रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास जळगांवहुन पाचोऱ्याच्या दिशेने येत असतांना नांद्रा ते हडसन दरम्यान दिनेश रामदास वाके, आशाबाई रामदास वाके व एक चिमुकले बाळ रा. दुसखेडा ता. पाचोरा हे दुसखेडा येथे जात असतांना यांच्या मोटरसायकल समोर अचानक नीलगाय आडवी आल्याने मोटरसायकलचा अपघात होवुन तिघ जण जखमी झाले होते. सदरचा प्रकार डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वाहन थांबवुन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांना घटनेची माहिती देत जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. राहुल बेहरे यांनी डाॅक्टरांना तातडीने पाचारण करत उपचार सुरू झाल्याने डी. वाय. एस. पी. धनंजय येरुळे, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांच्या सतर्कतेने तिचं जखमींचे प्राण वाचले आहे.