पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वानगा यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितल यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान कॉंग्रेसने दामू शिंगडा यांना उमेदवारी दिली आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.