पुणे-छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे लढवय्ये नेते आहेत. त्यांनी बांधलेले महाराष्ट्र सदन हाऊस हे अतिशय चांगले झाले आहे. खोटे-नाटे आरोप करून अंजली दमानिया यांनी त्यांना गोवल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला. पुण्यात ते बोलत होते. छगन भुजबळ हे उत्तम राजकारणी आहेत. तुरुंगात असताना सुद्धा त्यांचं राजकारण सुरूच होत. परंतु खोटे-नाटे आरोप करून अंजली दमानिया यांनी त्यांना गोवले” असल्याचे ते म्हणाले.
बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी छगन भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात होते. चार एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते कालच घरी पोहोचले आहेत.