चंडीगड: आपल्या नृत्याने तरुणाईला घायाळ करणाऱ्या प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी याने आज अधिकृतरित्या भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. यात त्यांनी सदस्यत्व स्वीकारले. भाजप नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.यावेळी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, भाजपा खासदार मनोज तिवारी आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक कलावंतांनी भाजपला पाठिंबा दर्शविला. सपना चौधरीने देखील भाजपला पाठिंबा दर्शविला होता. लोकसभा निवडणुकीत त्या कॉंग्रेसकडून लढणार अशी चर्चा होती, मात्र त्यांनी निवडणूक लढविली नाही.