मुंबई : ‘दंगल’ या चित्रपटामुळे नावलौकिक मिळविलेली अभिनेत्री झायरा वसिम हिने एकाएकी चित्रपट विश्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बालकलाकारा म्हणून ‘दंगल’ चित्रपटातून तिने चित्रपट करियरला सुरुवात केली होती. चित्रपटात झायराने आमिर खानच्या मुलीची म्हणजेच कुस्तीपटू गीता फोगाट हिच्या बालपणीची भूमिका प्रभावीपणे साकारली होती.
‘दंगल’मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आमिरसोबतच ती ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातूनही झळकली होती. पण, आता मात्र तिने एकाएकी चित्रपट विश्वातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेकांनाच धक्का बसला आहे.