भुसावळ – येथील खळवाडीतील रहिवाशी कै. कुंदन दत्तात्रय ढाके व यतीन दत्तात्रय ढाके यांचे वडील दत्तात्रय नथ्थू ढाके (वय ७८) यांचे दि.११ जून रोजी दुखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता खळवाडीतील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक योगेश्वर ढाके यांचे वडील होत.