मुक्ताईनगर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेहुण येथील दत्तू पाटील, व्हा चेअरमन पदी हिवरा येथिल मधुकर गोसावी यांची निवड
मुक्ताईनगर प्रतिनिधी……
मुक्ताईनगर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि मुक्ताईनगरच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 पैकी 15 संचालक बिनविरोध निवडून येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खरेदी विक्री संघावर एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते.
आज खरेदी विक्री संघ चेअरमन , व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी चेअरमनपदी मेहुण येथिल दत्तू किसन पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी हिवरा येथिल मधुकर रामपुरी गोसावी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक निवृत्ती भिका पाटील,प्रभाकर सोपान झोपे, प्रशांत प्रल्हाद जंगले, चंद्रकांत विनायक बढे,
सुरेखा पुंजाजी चौधरी, अलका एकनाथ झांबरे प्रशांत (बाळा)प्रभाकर भालशंकर,
ज्ञानदेव लक्ष्मण बढे,
, शांताराम काशिनाथ गव्हाळ,सोपान तुकाराम दुट्टे , गोपाळ चिंतामण पाटील, नरेंद्र मधुकर पाटील ,पुंडलिक शंकर कपले
हे संचालक उपस्थित होते
नवनिर्वाचित चेअरमन दत्तू पाटील आणि व्हाईस चेअरमन मधुकर गोसावी यांचा माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे, ,मुक्ताई सूतगिरणी चेअरमन रोहिणी खडसे यांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला
तालुक्यातील खरेदी विक्री संघ,कृषी उत्पन्न बाजार समिती वर आ एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, रोहिणी खडसे, विनोद तराळ यांच्या मार्गदर्शन आणि रणनीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकहाती झेंडा फडकला आहे
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण आहे
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मध्ये
यशाची हि घौडदौड अशीच कायम राहील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत