भुसावळ – येथील वेडीमाता मंदिर परिसरातील कांशीराम नगर येथील रहिवासी यशोदाबाई कोल्हे (वय 87) यांचे काल (दि.12 सप्टेंबर रोजी) सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांचेवर आज सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या पश्चात 2 मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. पी.जे. कोल्हे व अरुण कोल्हे यांच्या त्या मातोश्री होत.