मुंबई – टीव्हीच्या सोनी चॅनल वरील लोकप्रिय ठरलेल्या सीआयडी मालिकेतील अबालवृद्धांचा लोकप्रिय अभिनेता फ्रेडरिक्स अर्थात दिनेश फडणीस याचे आज निधन झाले. हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे त्याला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिनेश फडणीस याच्या निधनामुळे छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
सीआयडी मालिकेची लोकप्रियता इतकी तुफान होती की, त्यावेळी प्रत्येक मुलाला आपण सुद्धा मोठे होऊन सीआयडी ऑफिसर व्हावं अशी इच्छा व्हायची. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनात आढळतात निर्माण करू शकली. या मालिकेतील लोकप्रिय पात्र असलेल्या फ्रेडरिक्स म्हणजेच अभिनेते दिनेश फडणीस आजारी असल्याची बातमी चर्चेत होती. पण आता त्यांची प्राणज्योत मावळली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील तुंगा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरले. दिनेश फडणीस यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
दिनेश फडणीस यांचा जन्म २ नोव्हेंबर १९६६ मध्ये झाला. सीआयडी मालिकेत त्यांनी २० वर्ष काम करून प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यांनी या मालिके शिवाय सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चश्मा, अदालत यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती.
लहान मुलांमध्ये दिनेश फडणीस यांची विशेष क्रेझ पाहायला मिळायची. त्यांना सुद्धा लहान मुलांमध्ये रमायला आवडायचे. दिनेश अनेकदा आपल्या गोड नाती सोबत चे फोटो शेअर करायचे. विशेष म्हणजे दिनेश यांची नातीचा जन्म त्यांच्याच वाढदिवसाला झालेला, त्यामुळे ते अनेकदा माझ्या मुलीने माझ्या वाढदिवसाला दिलेली सर्वात उत्कृष्ट गिफ्ट म्हणजे माझे नातं असं कौतुकाने बोलायचे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांनी आपल्या पत्नी सोबतचे आणि नाती सोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.
दिनेश यांनी केवळ मालिकांमध्येच काम केले नाही तर ते उत्तम लेखक देखील होते. मराठी चित्रपटांचे लेखन त्यांनी केलेले. भरला हा मळवट रक्तानं या मराठी चित्रपटातून दिनेश यांनी आपल्या करिअर सुरुवात केलेली. पण नशिबाने त्यांना हिंदी सिनेमा इंडस्ट्रीकडे नेलं. आमिर खानच्या सरफरोश या चित्रपटात त्यांना पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पुढे साल २००० मध्ये त्यांनी मेला या चित्रपटात मेला दिलोंका या गाण्यात छोटीशी झलक दाखवलेली. काही वर्षांपूर्वीच रिलीज झालेल्या हृतिक रोशनच्या सुपर ३० या चित्रपटात सुद्धा दिनेश यांचे झलक पाहायला मिळाली.