रावळपिंडी – वॉट्स ऍप स्टेटसवर पाकिस्तानमध्ये इस्लामचा अपमान केल्याप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी महिलेचे नाव अनिका अतीक असं आहे. अनिकाविरोधात २०२० साली ईश्वरनिंदा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयाने तक्रारदार फारुक हसनातच्या तक्रारीनंतर बुधवारी या प्रकरणामध्ये निकाल दिला. अनिका अतीकवर तीन आरोप सिद्ध झाले आहेत. २६ वर्षीय अनिकाविरोधात निश्चित झालेल्या आरोपांमध्ये पहिला गुन्हा मोहम्मद साहब (ईश्वराचा) अपमान करणे, दुसरा गुन्हा इस्लामचा अपमान करणे आणि तिसरा गुन्हा सायबर कायद्याअंर्गत येतो.