चोपडा प्रतिनिधी
वराड तालुका चोपडा येथील पाण्याअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन ती समस्या सोडवण्यासाठी रोटरी क्लब, चोपडाने पुढाकार घेत लोक सहभागातून नाला खोलीकरणाचे काम सुरू केले आहे.
या कामाचा शुभारंभ नुकताच चोपडा तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री घनश्यामजी अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.
जलयुक्त शिवार साठी शासनाच्या उपाययोजना सुरू आहेतच, परंतु आपलेही त्यात योगदान असावे या भूमिकेतून शेतकऱ्यांनीही आपला सहयोग या कामासाठी दिला आहे .
यंदा होणाऱ्या पावसाचे पाणी अडविले गेले तर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून या नाला खोलीकरणामुळे जलसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे.
त्यामुळे रोटरी क्लब चोपडाच्या या उपक्रमाचे सर्व शेतकरी बांधवांनी विशेष कौतुक केले आहे.