डिझायनर सब्यसाची -दीपिकाची चॉईस

0

मुंबई: गेल्या काही दिवसापासून बॉलीवूड मध्ये लग्नसोहळा रंगताना दिसत आहे. अनुष्का शर्मा – विराट कोहली, सोनम कपूर – आनंद आहुजा आणि नुकताच प्रियांका -निक यांच्या साखरपुडा झाला असून आता बॉलीवूडचे बाजीराव- मस्तानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे लग्नामध्ये दीपिका-रणवीर कोणत्या अंदाजात झळकणार याविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

काही दिवसापूर्वी दीपिकाने लग्नासाठी दागिन्यांची खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देणार असून त्यांच्या घरातल्यांनी लग्नाच्या खरेदीला सुरुवात केली आहे.त्यानंतर आता दीपिका लग्नात परिधान करणाऱ्या कपड्यांच्या खरेदीसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लग्नात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या दीपिकाने तिचा लग्नातील ड्रेस डिझाइन करण्यासाठी डिझायनर सब्यसाची मुखर्जीची निवड केली आहे. सब्यसाचीने यापूर्वी अनेक कलाकारांचे ड्रेस डिजाइन केले असून अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नातही त्यानेच ड्रेस डिझाइन केला होता.