मुंबई:अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. यामध्येच आता अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांचे नावे जोडली गेली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून (एनसीबी) दीपिका, श्रद्धा, रकुल प्रीतला चौकशी सुरु आहे. दरम्यान आज शनिवारी दीपिका पदुकोनची चौकशी सुरु आहे. चौकशी दरम्यान दीपिकाने ड्रग्सबाबत मोबाईलवरून व्हाट्सएप चॅट केले होते अशी कबुली दिली आहे मात्र ‘मी कधीही ड्रग्सचे सेवन केलेले नाही’ असे सांगितले आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान दीपिकाने ही कबुली दिली आहे. त्यामुळे आता दीपिकाबाबत पुढे काय होते? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. दीपिकाने ड्रग्स घेतले नसल्याचे सांगितले आहे तर मग व्हाट्सएपवर ड्रग्स कोणासाठी मागविले होते? हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईल.
काल शुक्रवारी रकुल प्रीत सिंह, दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी झाली. त्यानंतर आज शनिवारी २६ रोजी दीपिका पदुकोनला चौकशीसाठी प्रचारण करण्यात आले आहे. दीपिका चौकशीसाठी हजर झाली असून चौकशीला सुरुवात झाली आहे. तासभरापासून चौकशी सुरु आहे. आजच श्रद्धा कपूर, सारा अली खानला देखील दुपारी चौकशीला बोलविले आहे.