दीपिका पादुकोण ठरली ‘वर्ल्ड मोस्ट गॉर्जिअस वूमन’ !

0

नवी दिल्ली: फोर्ब्स इंडियाने नुकतीच 100 ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टॉपच्या 5 महागड्या अभिनेत्रींपैकी दीपिका पादुकोण ही एक महागडी सेलिब्रेटी ठरली आहे. दीपिकाने वर्ल्ड मोस्ट गॉर्जिअस वूमन 2019चा किताब पटकावला आहे. अॅसीड हल्ल्यावर आधारित चित्रपट ‘छपाक’ची शूटिंग नुकतीच दीपिका पादुकोणने पूर्ण केली आहे. दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. याशिवाय दीपिका पती रणवीर सिंगसोबत ‘८३’मध्ये लग्नानंतर पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. ‘८३’ हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय. यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे.