मुंबई| मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचे केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने (क्युसीआय) प्रशस्तीपत्रकच मुंबई महापालिकेला दिले. यावरून मुंबई महापालिका काम करत आहे, असे दिसत आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. क्युसीआयचे प्रशस्तीपत्रक ही सुरुवात असून जिथे महापालिकेच स्वच्छतागृह तिथे मुंबईला असे प्रशस्तीपत्रक मिळणारच असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. यासाठी जरी आयुक्तांचे अभिनंदन केले असले तरी सरकारकडूनही प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले.
एअरकंडीशन, सोलार पेनेल्स, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स अशा सर्व सुविधांनी सज्ज असणार्या दादरमधील स्वच्छतागृहाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशीन्स असाव्यात हे शिवसेनेने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले वचन असून त्याची वचनपूर्ती झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केले. मुंबई विद्यापीठाचा कारभार अनागोंदी पद्धतीने चालला असून, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अॅडमिशनला स्थगिती द्या. विद्यापीठाचा सध्याचा कारभार पाहता मागच्या सरकारमधील शिक्षणमंत्री आणि कुलगुरू बरे होते का, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारला आणि शिक्षणमंत्र्यांना या निमित्ताने मित्रपक्षाकडूनच घरचा आहेर मिळाला आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील जकात चौक्या आणि पोलीस हटवल्याने मुंबईला सुरक्षेचे भगदाड पडले आहे. कुणी घुसून घातपात घडवू नये, अशी चिंता आदित्य यांनी व्यक्त केली.
Web Title- defecation free mumbai is beginning of cleanliness