‘आप’ला झटका; दिल्लीच्या विधानसभा अध्यक्षांना कारावास !

0

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांना येथील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये एका व्यक्तीला घरात घुसून मारहाण करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी गोयल यांना अवधी देण्यात आला आहे. १० हजार रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूरही झाला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे रामनिवास गोयल यांनी सांगितले.

दिल्लीतील रामनिवास गोयल हे आम आदमी पक्षाचे मोठे नेते आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे ‘आप’ला मोठा झटका बसला आहे.